⚡मालवण ता.०७-:
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) विभागामार्फत ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर यशस्वी ट्रेकिंग मोहीम आयोजित करण्यात आली. साहसी व शिस्तीचे धडे देणाऱ्या या उपक्रमात एकूण २९ विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
एनसीसी विभागामार्फत दरवर्षी विविध ठिकाणी ट्रेकिंग कॅम्प आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, कठोर परिश्रमाची सवय, शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन केले जाते. सदर ट्रेकिंग मोहिमेची सुरुवात सकाळी १० वाजता झाली. कडक उन्हातही विद्यार्थ्यांनी केवळ दोन तासात रायगड किल्ला सर करून दुपारी १२ वाजेपर्यंत ट्रेक पूर्ण केला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहास व किल्ल्याची पार्श्वभूमी समजावून सांगण्यात आली. दुपारच्या भोजनानंतर अवघ्या एका तासात विद्यार्थ्यांनी गड उतरण पूर्ण केली.
एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट प्रा. या ट्रेकिंग मोहिमेचे नियोजन डॉ. एम. आर. खोत यांनी केले. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एनसीसी सीनियर्स प्रसाद बागवे, कुणाल वेंगुर्लेकर, गौरव चव्हाण, राज लाड, साहिल मीर, ईशा दुखंडे, प्रगती भांडे व नियती पारकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. मुलींच्या सुरक्षिततेसाठी केअरटेकर म्हणून प्रा. अन्वेषा कदम सहभागी होत्या. या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच कृ. सी. देसाई कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकुर, कोषाध्यक्ष नंदन देसाई यांच्यासह गणेश कुशे, सहसचिव संदेश कोयंडे, इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेखर, लेफ्टनंट कर्नल तनुज कुलदीप कर आदींनीही विद्यार्थ्यांच्या मंडलिक, सुभेदार मेजर सुधाकर कामगिरीचे कौतुक केले.
