Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ येथे १२ एप्रिल रोजी विशाल हिंदू संमेलन…

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान.. कुडाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कुडाळ येथे “विशाल हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे पार पडणार आहे.हजारो वर्षांची परंपरा, संतांचे विचार, क्रांतिकारकांचे बलिदान आणि आपल्या पूर्वजांनी जपलेली सनातन हिंदू संस्कृती याबद्दल…

Read Full News

एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या गोवा व देवगड येथील नौकांवर कारवाई…

⚡मालवण ता.०९-:मालवण समोरील समुद्रात बेकायदेशीरपणे एलईडी मासेमारी करणाऱ्या गोवा व देवगड येथील नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली आहे. या दोन्ही नौका तसेच त्यावरील साहित्य मत्स्य विभागाने जप्त केले आहे. बुधवारी ८ एप्रिल रोजी रात्री मत्स्यव्यवसाय विभागाचे गस्ती पथक मालवण समोर समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी देवगड येथील परवाना असलेली नौका चित्रा-१ (नों….

Read Full News

मालवणचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्यावतीने खासदार राणे यांच्या वाढदिवसा निमित्त नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसचे वितरण…

⚡मालवण ता.०९-:माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविताना मालवण शहर प्रभाग ६ मध्ये तसेच नांदरुख येथील श्री देव गिरोबा मंदिर परिसरात भाविक व नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसचे वितरण केले आहे. यावेळी खासदार नारायण राणे यांना दीर्घायुष्य लाभो अशी ही…

Read Full News

मालवणमध्ये ‘शार्क आणि पाकट’ माशांच्या संवर्धनासाठी कार्यशाळेचे आयोजन…

⚡मालवण ता.०९-:समुद्री परिसंस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या शार्क (मुशी) आणि रे (पाकट) माशांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी मालवणमध्ये एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दक्षिण फाउंडेशन’ या संस्थेमार्फत १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत दांडेश्वर मंदिर, मालवण येथे ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर गेल्या काही वर्षांत येथील शार्क आणि…

Read Full News

विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये…

कवी रुजारिओ पिंटो यांचे प्रतिपादन.. ⚡मालवण ता.०९-:व्यसनापासून दूर राहिल्यामुळेच समाजात विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली आणि मान-सन्मान मिळाला, म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये असे प्रतिपादनप्रसिद्ध मालवणी कवी आणि उद्योजक रुजरिओ उर्फ बाबला पिंटो यांनी येथे बोलताना केले मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी…

Read Full News

थकीत वीज बिलामुळे मालवणमधील मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयाची वीज खंडित…

⚡मालवण ता.०९-:मालवण तहसील कार्यालयाच्या अखत्यारितील मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे वीज वितरणने खंडित केला आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस दोन्ही कार्यालये विजेविना सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. मालवण येथील मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयातून नागरिकांना कागदपत्रे घेण्यासाठी जावे लागते. मात्र, गेले काही दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना कागदपत्रे मिळेनाशी झाली….

Read Full News

पडेलमध्ये उबाठाला खिंडार,नामदार नितेश राणे यांच्या हस्ते उबाठा कार्यकर्त्यांच्या भाजपामध्ये प्रवेश…

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश:पडेल ग्रामपंचायतीचे दोन सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश.. ⚡ओरोस ता.०९-: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेलमध्ये उबाठा पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते उबाठा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात…

Read Full News

दाभोलीश्री देव नारायण चा वर्धापनदिन कार्यक्रम उद्या…

⚡वेंगुर्ला ता.०९-: तालुक्यातील दाभोलीश्री देव नारायण चा 13 वा वर्धापनदिन शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे सकाळी पूजाविधी, सत्यनारायण पूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 5 वाजता कु. सानिका संदिप गोखले [संगीत विशारद) यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वाजता श्रींचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे.भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन…

Read Full News

शिरोडा येथील गुन्ह्यातील दोन्ही संशयितास न्यायालयीन कोठडी…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला तालुक्यातीलशिरोडा येथील युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न करुन फरार झालेल्या गुन्हयातील संशयित दर्शन दयानंद गडेकर( वय 25 वर्षे),भुषण दयानंद गडेकर (वय30 वर्षे) दोन्ही रा.शिरोडा खासबागवाडी ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग यादोन संशयिताना वेगुर्ला पोलीसांनी मोठ्या शिताफीने शोध घेऊन सावंतवाडी बावळाट येथुन त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांना अटक करून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती….

Read Full News

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य अमृत महोत्सवी सोहळा…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती; सोनू निगम लाईव्ह कॉन्सर्ट ठरणार मुख्य आकर्षण.. कणकवली : नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस आज कणकवली येथे भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार असून यानिमित्त अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप व महायुतीतील घटक पक्षांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे. सायंकाळी ६ वाजता उपजिल्हा…

Read Full News

You cannot copy content of this page