मालवणचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्यावतीने खासदार राणे यांच्या वाढदिवसा निमित्त नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसचे वितरण…

⚡मालवण ता.०९-:
माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविताना मालवण शहर प्रभाग ६ मध्ये तसेच नांदरुख येथील श्री देव गिरोबा मंदिर परिसरात भाविक व नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसचे वितरण केले आहे.

यावेळी खासदार नारायण राणे यांना दीर्घायुष्य लाभो अशी ही प्रार्थना सहदेव बापर्डेकर यांनी श्री देव गिरोबा चरणी केली आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक व नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंचेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबत मालवण शहर प्रभाग ६ या ठिकाणी बबन मिटकर घराच्या बाजूला, सोहनी घर मागील बाजूस रस्तावर राजकोट ते कचेरी मार्गांवर, भाऊ केळूसकर कंपाउंड मागील रस्त्यावर समुद्र दिशेने, रंजन मुणगेकर यांच्या घराच्या समोरील किनारा दिशेन तसेच राजकोट येथील एक्वा ऑफिस बाजूला बॅंचेस बसवण्यात आले आहे. पर्यटक व नागरिकांना बसण्याची सोय व्हावी या उद्देशाने बँचेस बसवण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page