कवी रुजारिओ पिंटो यांचे प्रतिपादन..
⚡मालवण ता.०९-:
व्यसनापासून दूर राहिल्यामुळेच समाजात विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली आणि मान-सन्मान मिळाला, म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये असे प्रतिपादन
प्रसिद्ध मालवणी कवी आणि उद्योजक रुजरिओ उर्फ बाबला पिंटो यांनी येथे बोलताना केले
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी तसेच प्रसिद्ध मालवणी कवी आणि उद्योजक रुजरिओ उर्फ बाबला पिंटो यांचे “मी कसा घडलो” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान पार पडले.यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक एच बी तिवले, प्रा पवन बांदेकर, प्रा स्नेहल पराडकर, प्रा गुरुनाथ दळवी प्रा गणेश सावंत ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, प्रा सौ वैभवी गोडकर, प्रा प्राजक्ता कोरगावकर आदी व इतर उपस्थित होते प्रारंभी मुख्याध्यापक एच बी तिवले यांनी स्वागत केले तर प्रास्ताविक प्रा बांदेकर यांनी केले
यावेळी पिंटो यांनी “मी कसा घडलो” या विषयावर बोलताना आपल्या आयुष्यातील विविध प्रेरणादायी प्रसंग उलगडून दाखवले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपल्या खास शैलीत मालवणी कविता सादर करत विद्यार्थ्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाचीही उपस्थिती लाभली. शेवटी प्रा स्नेहल पराडकर यांनी आभार मानले
