Headlines

नापणेचा धबधबा पाहण्याच्या मोहापायी चौघे विद्यार्थी शाळा बुडवून वैभववाडीत…

स्टेशन मास्तरांच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस; पोलिसांच्या तत्परतेमुळे चारही विद्यार्थी पालकांच्या ताब्यात..

⚡वैभववाडी ता.१४-: वैभववाडी तालुक्यातील प्रसिद्ध नापणे येथील काचेचा पुल व धबधबा पाहण्याच्या मोहातून
शाळेत जात असल्याचे सांगून घरातून निघालेल्या सावंतवाडीतील नववीच्या चार अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेत न जाता थेट वैभवाडी रेल्वे स्टेशन गाठले.
स्थानक मास्तराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून वैभववाडी पोलिसांनी तत्परता दाखवत मुलांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची विचारपूस करून आणि पालकांची संपर्क साधून त्यांना सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले आहे.
सावंतवाडी येथील एका माध्यमिक विद्यालयात नववीत शिकणारे चार मित्र सकाळी शाळेत जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले मात्र शाळेत न जाता त्यांनी सावंतवाडी रेल्वेने वैभववाडी गाठली. नापणे येथील काचेचा धबधबा पाहण्याचा त्यांचा बेत होता वैभववाडी रेल्वे स्थानकावर ही मुले फिरत असल्याचे स्टेशन मास्तर च्या लक्षात येतात त्यांनी तातडीने यासंदर्भात वैभववाडी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळतात पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी पोलीस हवालदार शैलेश कांबळे आणि कॉन्स्टेबल समीर तांबे यांना रेल्वे स्थानकावर पाठवून सदर चार ही मुलांना वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी केली यामध्ये दोन विद्यार्थी सावंतवाडीतील तर दोन विद्यार्थी कुडाळ येथील असल्याचे समजले. आपण धबधबा पाहण्यासाठी वैभववाडी आल्याचे त्यांनी सांगितले. अनोळखी ठिकाणी आलेल्या या मुलांना पोलिसांनी चौकशी पूर्ती मर्यादित न ठेवता आपुलकीची वागणूक देऊन त्यांना खाऊ पिऊ घातले.
त्यांच्याकडून पालकांचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वैभववाडी येथे बोलून घेतले.
चारही मुलांचे पालक वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये सायंकाळी हजर झाले पोलिसांनी पालकांकडे पुन्हा विद्यार्थ्यांची चौकशी करून चारही मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे स्टेशन मास्तरांची सतर्कता आणि वैभववाडी पोलिसांचे तत्परता यामुळे चारही मुले सुखरूप घरी पोहोचली आहेत त्यामुळे पालकांनीही समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page