Headlines

पुरात म्हैस वाहून गेल्याने शेतकऱ्याला ३७ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई…

तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते विकास महाडिक यांना मदत मंजुरीचे पत्र प्रदान..

वैभववाडी प्रतिनिधी
कुर्ली गावातील ​नदीच्या पुरात म्हैस वाहुन मृत्यू झाल्याने वैभववाडी तहसीलदार यांनी शासकीय योजने अंतर्गत 37500/- नुकसान भरपाई नुकतीच शेतकरी विकास गणपत महाडिक यांना देण्यात आली.
यावेळी नायब तहसीलदार निकम,सेवा निवृत्त नायब तहसीलदार दिलीप पाटील, उपसरपंच कुर्ली अंबाजी हुंबे, विनोद दळवी ,कृष्णा कदम उपस्थित होते.
​कुर्ली येथील शेतकरी विकास गणपत महाडिक यांची मुरा म्हैस दिनांक 6 सप्टेंबर रोजी नदीच्या महापुरात वाहून देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामध्ये बुडून मृत्यू झाला.या घटनेचा पंचनामा कुर्ली तलाठी यांनी केली,त्याच प्रमाणे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शव विच्छेदन करून अहवाल तहसीलदार यांना पाठविला होता.
त्यानुसार तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी शासकीय योजनेअंतर्गत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात आली.
​*फोटो:वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते शेतकरी विकास महाडिक यांना मदत मंजुरीचे पत्र देताना. उपस्थित दिलीप पाटील व अन्य फोटो संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page