⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला तालुक्यातील
शिरोडा येथील युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न करुन फरार झालेल्या गुन्हयातील संशयित दर्शन दयानंद गडेकर( वय 25 वर्षे),भुषण दयानंद गडेकर (वय30 वर्षे) दोन्ही रा.शिरोडा खासबागवाडी ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग या
दोन संशयिताना वेगुर्ला पोलीसांनी मोठ्या शिताफीने शोध घेऊन सावंतवाडी बावळाट येथुन त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांना अटक करून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना आज गुरुवारी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी वेंगुर्ला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही संशयिताना 22 एप्रिल पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिरोडा परबवाडा येथील समीर हरीश्चंद्र परब (वय 20)
याने वेंगुर्ला पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार 27 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील संशयित यांनी गुन्हयातील साक्षीदार नामे बबलु ऊर्फ श्रीनाथ विजय परब( वय 30 वर्षे, रा. शिरोडा, परबवाडा ता. वेंगुर्ला) यास जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडयाने डोक्यावर मारहाण करुन जखमी करुन ते गुन्हा घडल्यापासुन फरार झाले होते. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, पोलीस हवालदार प्रसाद कदम, पोलीस हवालदार योगेश राऊळ, पोलीस हवालदार स्वप्निल तांबे, पोलीस अंमलदार प्रथमेश पालकर, पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, महिला पोलीस सिंधू मोंगल, महिला पोलीस सलोनी कांबळे यांनी दोन्ही संशयितास ताब्यात घेण्यात यश मिळविले होते. वेंगुर्ला पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
शिरोडा येथील गुन्ह्यातील दोन्ही संशयितास न्यायालयीन कोठडी…
