Headlines

डेगवे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे उत्साहात वाटप…

⚡बांदा ता.१४-: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने डेगवे येथील श्री देव स्थापेश्वर विद्या विकास मंच आणि पालक यांच्या संयुक्त सहकार्यातून माध्यमिक विद्यालय, डेगवे येथील विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा गणवेशांचे उत्साहपूर्ण वातावरणात वाटप करण्यात आले.
क्रीडा गणवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे भाव उमटले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नवी प्रेरणा मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला स्थापेश्वर विद्या विकास मंचचे संस्थापक पी. एन. तेली, डेगवे सरपंच राजन देसाई, माजी सरपंच व बांदा भाजपा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, डेगवे सोसायटीचे चेअरमन प्रवीण देसाई, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय देसाई, कार्यकारिणी सदस्य गणपत देसाई, भीमसेन (पप्पू) देसाई, रामचंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रशालेचे मुख्याध्यापक एस. के. सावंत यांनी केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एच. मगदूम यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल शालेय प्रशासनाने स्थापेश्वर विद्या विकास मंच, पालक वर्ग व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page