जिल्हा कलाध्यापक संघटनेचा कलाशिक्षक रणजित दळवी यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात
*ð«कणकवली दि.१८-:* कळसुली हाय.येथे कार्यरत असलेले कलाशिक्षक रणजित अंकुश दळवी यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्याचे धैर्य त्यांच्या कुटुंबियांना यावे शिवाय आपल्या सहकारी व्यक्तीच्या कुटुंबीयांना आधार देण्याच्या उद्देशाने महाराष्ट राज्य कलाध्यापक संघ जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्यावतीने जिल्ह्यातील सर्व कलाध्यापकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व कलाध्यापकांनी मोठ्या संख्येने संघटनेच्या…
