कणकवलीत गावठी आठवडा बाजार 29 ऑक्टोबरपासून भरणार

कणकवली प.स.सभापती मनोज रावराणे यांनी दिली माहिती

*⚡कणकवली ता.२७-:* कोरोनाच्या पाश्वभूमिवर कणकवलीचा गावठी आठवडा बाजार काही काळासाठी बंद करण्यात आला होता.आता कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळून पुन्हा एकदा शुक्रवार 29 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती सभापती मनोज रावराणे यांनी दिली.गावठी आठवडा बाजाराचे उदघाटन आम.नितेश राणे यांच्या हस्ते व जि.प अधक्ष सौ.संजना सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवार 29 ऑक्टोबर रोजी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे होणार आहे.सदरचा गावठी आठवडा बाजार पूर्वी प्रमाणे दर शुक्रवारी हायवे नजीक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भरवला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व पं स कणकवलीच्या पुढाकाराने व स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विदयमाने 26 जानेवारी 2017 रोजी जिल्ह्यातील पहिला गावठी आठवडा बाजार कणकवली येथे सुरू करण्यात आला.सदरचा बाजार आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी भरवण्यात येत होता. त्याला प्रचंड प्रतिसाद स्थानिक शेतकऱ्यांकडुन लाभला. परंतू तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला गावठी माल स्थानिक पातळीवर विक्रीसाठी नेऊन त्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी.तसेच सर्वसामान्य जनतेला ही आरोग्या च्या दृष्टीने नैसर्गिक खतावर बनलेली पौष्टिक भाजी, फळे सहज रित्या योग्य दारात उपलब्ध व्हावी व शेतकऱ्याचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा या हेतूने सदरचा गावठी आठवडा बाजार पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय पं.स कणकवली व स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग च्या सयूंक्त विद्यमाने घेण्यात आलेला आहे. या साठी नारायण राणे तसेच आमदार नितेश राणे यांचे योगदान मोलाचे आहे.त्यांच्या प्रेरणेतूनच पुन्हा एकदा नव्या उमेदीने हा गावठी आठवडा बाजार आम्ही सुरू करीत आहोत. तरी ज्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गावठी आठवडा बाजारात आपला स्थानिक गावठी माल विक्रीसाठी अनावयाचा असेल त्यांनी आपला माल घेवून शुक्रवार 29 ऑक्टोबर 2021 पासून पुढे दर शुक्रवारी कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थिती राहावे.तसेच तालुका व जिल्ह्यातील सर्व जनतेने कोरोनाच्या नियम व अटींचे पालन करून याचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती मनोज रावराणे,उपसभापती प्रकाश पारकर ,गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, प.स.कणकवली व स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page