जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्तीपत्र
*⚡सावंतवाडी ता.२७-:* रामचंद्र ऊर्फ अजय सावंत यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत अजय सावंत यांना याबाबत नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती झाल्याने अजय सावंत यांचे सर्व स्तरातून अभिनंदनहोत आहे.
