वालावलकर ज्युनिअर कॉलेजची जामसांडे बाजारपेठत कायद्याची जनजागृती

देवगड विधी सेवा, वकील संघटनेचा उपक्र

देवगड देवगड तालुका विधी समिती,व देवगड तालुका वकील संघटना यांचे संयुक्त विद्यमाने” आझादी का अमृत महोत्सव “या निमित्ताने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम अंतर्गत “ओळख कायद्याची “या कार्यक्रमात ‘कौटुंबिक हिंसाचार,मुलगा मुलगी भेदभाव,लोकन्यायालयात तंटे वाद कसे मिटविले जातात याची जनजागृती जामसंडे बाजारपेठेत देवगड येथील एन.एस.पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय च्या विदयार्थी विद्यर्थिनींनी पथनाट्यद्वारे नागरिकांसमोर सादरीकरण करण्यात आले . २ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत प्राधिकरण विधी सेवा समिती दिल्ली ,महाराष्ट्र प्राधिकरण विधी सेवा समिती यांचे आदेशाने जिल्हा व तालुका विधी सेवा समिती प्राधिकरण यांचे सहकार्याने देवगड चे दिवाणी न्यायाधीश बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने बुधवारी सकाळी जामसंडे बाजारपेठ पिकअप शेड समोर कौटुंबिक वाद,हिंसाचार, कुटुंबात निर्माण होणारे वाद कसे सोडवावेत .या मार्फत गाव पातळीवरील व .याची परिपूर्ण माहिती ओळख कायद्याची या अंतर्गत विविध टप्प्यावर पथनाट्य द्वारे नागरिकांसमोर देवगड कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यर्थिनी यांनी पथनाट्यद्वारे देण्यात आली.तसेच विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहितीही उपस्थित नागरिकांना देण्यात आली. या पथनाट्य मध्ये देवगड महाविद्यालय विद्यार्थी दीपाली गोगटे,प्रणय बिडये ,कृतिका पवार,दर्शन डोंगरे,अशकांन खान,श्रुती पावसकर,आकांक्षा पाटकर,रेणुका गुरव यांनी सहभाग घेतला व पथनाट्य सादरीकरण केले.या प्रसंगी देवगड दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश बि.आर.पाटील,पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे देवगड महाविद्यालयाचे,प्रा रमाकांत बांदेकर,प्रा विनोद चिंदरकर,स्वप्नील वाळके प्राध्या मनाली गावकर,प.स.चे विनायक धुरी देवगड न्यायालयाचे कर्मचारी,नागरिक व्यापारी,रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page