जि.प.च्या स्वच्छता मोहिम अभियानाला कासार्डे येथे विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

*⚡कणकवली ता.२७-:* जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या संकल्पनेतून व जि. प. सिंधुदुर्गच्या माध्यमातून स्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा आत्तापर्यंत महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. या वर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अग्रस्थानी राहण्यासाठी सर्वस्तरातून जिल्हाभर स्वच्छता मोहीम अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, सर्व शासकीय कार्यालये अशा विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम जोरदारपणे सुरू असून या मोहिमेत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छतेचे महत्व विद्यार्थी दशेत लक्षात येण्यासाठी ही शाळा शाळामधून मोहीम राबवली जात असल्याची माहिती विस्ताराधिकारी सुहास पाताडे यांनी कासार्डे माध्यमिक विद्यालयात अभियान सुरु असताना दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील या स्वच्छता अभियानाला विद्यार्थी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे ही त्यांनी सांगितले. या स्वच्छता अभियानात कासार्डे माध्य. विद्यालयाचे प्राचार्य एम.डी खाड्ये पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर विज्ञान शिक्षक एस.व्ही. राणे, क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड व विद्यार्थी सहभागी झाले होते. मान्यवर व विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबवले.अभियान वर्षभर नियमितपणे राबविण्यात येईल अशी ग्वाही प्राचार्य खाड्ये यांनी दिली.

You cannot copy content of this page