मालवण तंत्रनिकेतनमध्ये लसीकरण मोहीम

*⚡मालवण ता.२७-:* शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, आरोग्य सहाय्यक आर. एस. रणसिंग, एल. सी. नातेवाड, श्रीमती डी. व्ही. धोत्रे, श्रीमती वाय. यू. नार्वेकर, आदी उपस्थित होते. यावेळी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना मिशन युवा स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले.

You cannot copy content of this page