आचरा समुद्र किनारी भव्य गार्डन उभारण्याची मागणी;

पालकमंत्री उदय सामंत यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष

*⚡मालवण ता.२७-:* मालवण मधील रॉकगार्डन च्या धर्तीवर आचरे समुद्रकीनारी भव्य गार्डन, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी उद्यानाची उभारणी करावी अशी मागणी आचरे येथील शिवसेना पदाधिकारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांना आचरे शिवसेना पदाधिकारी समीर हडकर, प्रकाश वराडकर, जयंत पांगे, गजानन गावकर, राजन पांगे आदीनी निवेदन दिले सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील निसर्गसंपन्नतेने नटलेले आचरा गाव हे येथील स्वयंभु व अतिप्राचीन असलेल्या सुप्रसिध्द इनामदार श्री देव रामेश्वराच्या जागृत देवस्थानामुळे कोकण भुमीसह सातासमुद्रापार ओळखले जाते. या आचरा गावास समुद्राची विस्तिर्ण किनारपटटी लाभलेली आहे. त्यामुळेच तेथे बारमाही पर्यटकांची वर्दळ असते निसर्गरम्य व शांत असलेला समुद्र किनारा, नैसर्गिक वैविधपुर्ण हरितसमृध्दी, जामडूल बेट त्याचबरोबर भौगोलिक दृष्टया दळण वळणाच्या दृष्टीने केंद्रस्थानी असलेले गाव यामुळेच अनेक पर्यटक, इतिहास संशोधक, इ. लोकांची पाउले गेल्या अनेक दशकापासून येथे वळत आहे. मालवण तालुक्यातील प्रशिस्त रॉकगार्डन च्या धर्तीवर आचरे समुद्रकीनारी असे एखादे भव्य गार्डन, तसेच प्रत्येक दिवशी समुद्र किनारी फिरावयास येणारे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नाना नानी उद्यानाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व आपल्या प्रयत्नाने झाल्यास जनसामान्यासहीत बाहेरील पर्यटनासाठी आकर्षणाचा मानबिंदु ठरेल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page