*⚡मालवण ता.२७-:* ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉम सलग्न), मालवण तर्फे दरवर्षी दिवाळीनिमित्त अणाव येथील वृद्धाश्रमास दिवाळी फराळ व कपडे पाठविण्यात येतात. यावर्षीही दिवाळी फराळ, साबण, उटणे व नवीन कपडे आश्रमासाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे संघाच्या सर्व सदस्यांनी फराळ व कपडे २ नोव्हेंबरपर्यंत भाऊ हडकर यांच्याकडे अवश्य आणून द्यावेत, असे आवाहन मालवण ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिक संघ देणार वृद्धाश्रमासाठी फराळ व कपडे
