राहत्या घरी संपविली जीवन
मालवण : (प्रतिनिधी) वायरी भूतनाथ केळबाई मंदिर येथील ज्योती श्रीकृष्ण मसुरकर (वय ७०) या वृद्ध महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आली आहे. दरम्यान, या प्रकरणी मालवण पोलिस स्थानकात खबर देण्यात आली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. ज्योती मसुरकर या मुलगा, सून, यांच्या समवेत वायरी भूतनाथ केळबाई मंदिर परिसरातील घरी राहतात. त्या मणक्याच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी घरातील एका खोलीत दोरीने गळफास लावून तिने आत्महत्या केली. याबाबत माहिती मालवण पोलिसांना देण्यात आली असून प्राथमिक तपासाअंती ज्योती यांनी आजरपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, भारत फारणे, पोलीस नाईक विलास टेंबूलकर, वृषाली पाटील, सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास डी जानकर करत आहेत.
