Headlines

Global Maharashtra Breaking News

ओटीपी अभावी सिंधुदुर्गातील LPG गॅस ग्राहक इंधनापासून वंचित…

ओटीपीला नेटवर्कचा अडसर:सुधारणा न झाल्यास युवासेना जाब विचारणार.. ⚡कुडाळ ता.१४-: ओटीपी अभावी सिंधुदुर्गातील LPG गॅस ग्राहक इंधनापासून वंचित राहत आहे. खेडोपाडीओटीपी मिळण्यासाठी नेटवर्कचा अडसर होत आहे. यात सुधारणा न झाल्यास युवासेना जाब विचारेल असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी दिला आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगर कपाऱ्याचा व…

Read Full News

तालुक्यातील १० ग्रामपंचायतींतील ११ जागा बिनविरोध….

भाजप पुरस्कृत सर्व उमेदवार झाले बिनविरोध:काही ठिकाणी लढत निश्चित.! कणकवली : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट झाले असून दहा ग्रामपंचायतींतील ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने त्या जागांवर बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी मात्र एकापेक्षा अधिक अर्ज आल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे…

Read Full News

कला ही साध्य नसून समाज परिवर्तनाचे साधन आहे…

अमरजीत आमले:बॅ. नाथ पै सेवांगण येथे सिनेमा कार्यशाळेचा समारोप.. ⚡मालवण ता.१३-:कला ही केवळ मनोरंजनासाठी किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी नसून ती समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. यासाठी कलाकाराच्या मनात समाजाप्रती प्रचंड कळकळ असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व निर्माते अमरजीत आमले यांनी केले. कलाप्रेमी बॅ. नाथ पै यांच्या ५५ व्या स्मृतिदिनानिमित्त बॅरिस्टर नाथ…

Read Full News

हळवल परबवाडी प्रभाग क्र. ३ मध्ये गौरी परब यांनी भरला उमेदवारी अर्ज…

कणकवली : तालुक्यातील हळवल ग्रामपंचायतीच्या परबवाडी प्रभाग क्रमांक ३ मधील सदस्य सान्वी गावडे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने येथे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या अनुषंगाने सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गौरी लवू परब यांनी तहसीलदार कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान यानंतर अन्य अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे गौरी परब यांची ग्रामपंचायत…

Read Full News

वेंगुर्ला मठ सावंतवाडी मार्गावर दुतर्फा धोकादायक झाडे…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला – मठमार्गे सावंतवाडी हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग आहे. या मार्गाच्या दुतर्फा जीर्ण झालेली व झुकलेली झाडे धोकादायक स्थितीत उभी आहेत. दीड महिन्यांनी पावसाळा हंगाम सुरु होणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षमुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. याबाबत या भागाचे आमदार दिपक केसरकर यांनी वेळीच लक्ष पुरवून कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात…

Read Full News

वेतोरे सोसायटी व्हाईस चेअरमनपदी संतोषी नाईक यांची बिनविरोध निवड…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे श्री देवी सातेरी प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, वेतोरे च्या व्हाईस चेअरमनपदी संतोषी संतोष नाईक यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत साळगावकर यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमन उत्तम वालावलकर, संचालक न्हानू वराडकर, सखाराम नाईक, प्रज्ञा पायनाईक, महानंद नाईक, नारायण शेर्लेकर, सतीश राऊळ, सुनील…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदच्या परीक्षेमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल रोजी…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत राबवण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेसाठी एकूण ५०७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २४८५ उमेदवार परीक्षेत उपस्थित राहिले होते. सदर उमेदवारांचा परीक्षा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त झाला आहे. सदर यादी बँकेच्या वेबसाईटवर…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात पोटनिवडणुकीची पोटनिवडणुकीची चुरस…

माजगावमध्ये सरपंचपदासाठी चार महिला उमेदवार रिंगणात.. ⚡सावंतवाडी ता.१३-:तालुक्यात २९ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या रिक्त थेट सरपंच व सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असून 15 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून माजगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच…

Read Full News

कणकवली शहरातील रवळनाथ मंदिर चौकाला महाराणा प्रताप नाव देण्याची मागणी…

⚡कणकवली ता.१३-:कणकवली शहरातील रवळनाथ मंदिर नजीक असलेला चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा भाग असून या चौकास राष्ट्राभिमान व इतिहासाची जाणीव जपणाऱ्या महान योद्धा महाराणा प्रताप यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक राकेश राणे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी “वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक” असे नामकरण करण्याचे निवेदन मुख्याधिकारी गौरी पाटील व…

Read Full News

कणकवलीत ८ कोटींचा टेंडर घोटाळा उघड…

एकाच ठेकेदाराला १४२ कामे ; २१ टेंडर रद्द:स्वीकृत नगरसेवक सत्यजित पारकर यांनी त्या ठेकेदाराची कुंडलीच काढली ⚡कणकवली ता.१३-:नगरपंचायतीच्या विशेष सभेत प्रशासकीय काळात मंजूर करण्यात आलेली तब्बल २१ टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुमारे ८ कोटी रुपयांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक सत्यजित पारकर यांनी केला आहे. एकाच ठेकेदाराला ही…

Read Full News

You cannot copy content of this page