कणकवली शहरातील रवळनाथ मंदिर चौकाला महाराणा प्रताप नाव देण्याची मागणी…

⚡कणकवली ता.१३-:
कणकवली शहरातील रवळनाथ मंदिर नजीक असलेला चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा भाग असून या चौकास राष्ट्राभिमान व इतिहासाची जाणीव जपणाऱ्या महान योद्धा महाराणा प्रताप यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक राकेश राणे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी “वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक” असे नामकरण करण्याचे निवेदन मुख्याधिकारी गौरी पाटील व नगराध्यक्ष संदेश पारकर यांना नगरपंचायतीत सादर केले.

यावेळी नगरसेवक स्वप्निल उर्फ दादू राणे तसेच नगरसेविका आर्या राणे उपस्थित होत्या. राकेश राणे यांनी सांगितले की, महाराणा प्रताप यांनी आपल्या शौर्य, पराक्रम व स्वाभिमानाच्या जोरावर संपूर्ण देशात आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याची आठवण कायम राहावी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी या चौकास त्यांचे नाव देणे आवश्यक आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आपण या मताशी सहमत असल्याचे सांगितले. तसेच या संदर्भात आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देत लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले.

You cannot copy content of this page