वेतोरे सोसायटी व्हाईस चेअरमनपदी संतोषी नाईक यांची बिनविरोध निवड…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे श्री देवी सातेरी प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, वेतोरे च्या व्हाईस चेअरमनपदी संतोषी संतोष नाईक यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत साळगावकर यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमन उत्तम वालावलकर, संचालक न्हानू वराडकर, सखाराम नाईक, प्रज्ञा पायनाईक, महानंद नाईक, नारायण शेर्लेकर, सतीश राऊळ, सुनील जाधव, अर्जुन कानडे आदी उपस्थित होते.यावेळी संतोषी नाईक यांचे उपस्थित संचालक तसेच सूर्याजी नाईक,संस्था कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page