Headlines

खासकीलवाड्यात चार विकासकामांचे भूमिपूजन…

आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कामांना चालना; संजू परब, स्नेहा नाईक यांच्या प्रयत्नांना यश

⚡सावंतवाडी, ता. १४-: सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील खासकीलवाडा परिसरातील चार विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. जिल्हा वार्षिक नियोजनातून मंजूर झालेल्या या कामांसाठी सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब आणि नगरसेविका स्नेहा नाईक यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला आहे.

या विकासकामांमध्ये खासकीलवाडा येथील नारायण पुंडलिक नाईक यांच्या घरापासून अथर्व अपार्टमेंटपर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे व संरक्षक भिंत बांधणे, रॉड्रिक्स यांच्या घरापासून कोठावळे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण, खासकीलवाडा वारंग पाणंद येथे संरक्षक भिंत व गटार बांधकाम तसेच निखिल गावडे यांच्या घरापासून शिल्पग्रामपर्यंत गटार बांधकाम या कामांचा समावेश आहे.
या कामांमुळे परिसरातील रस्ते, गटार व्यवस्था आणि संरक्षक भिंती यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार असून, नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेविका स्नेहा नाईक, माजी नगरसेवक उमा वारंग, सुनील नाईक, हितेन नाईक, नीलम कुमठेकर यांच्यासह खासकीलवाडा प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page