Headlines

रेवंडी सड्यावर तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीतील मृतदेह आढळल्याने खळबळ

मालवणः (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील रेवंडी तांडेलवाडी सडा येथील रस्त्यानजीकच्या झाडीत आज ९ वाजण्याच्या सकाळी एका तरुणाचा झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित तरुण देवगड तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी दीपक शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस हेडकोंस्टेबल जनार्दन रेवंडकर, राजाराम तेरेखोलकर यांनी दाखल होत पाहणी केली.

घटनास्थळी एक मोटरसायकल आढळून आली आहे. या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण केले आहे. घटनेचे नेमके स्वरूप आणि मृत्यूचे कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

You cannot copy content of this page