अतुल काळसेकर यांच्या हस्ते उद्घाटन; गोवा युवा मोर्चाध्यक्ष तुषार केळकर यांची उपस्थिती..

⚡दोडामार्ग, ता. १४-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवाभावी विचारांतून, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेने भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, आरोग्याबाबत जनजागृती व्हावी तसेच गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवस केवळ शुभेच्छा व सत्कारापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून जनसेवेचा संकल्प प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी गोवा राज्य भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार केळकर, भाजपा राज्य युवा नेते विशाल परब, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पराशर सावंत, भाजपा माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गोवा राज्य भाजपा युवा मोर्चाध्यक्ष तुषार केळकर, सचिव श्री. केणी, जिल्हा परिषद सदस्य श्वेता धरणे, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, सभापती पार्वती गवस, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, सदस्या सोनाली नाईक, पराशर सावंत, डॉ. बाबासाहेब राणे यांच्यासह अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
नगराध्यक्ष चेतन चव्हाण व जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस यांनी विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले. विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या महाआरोग्य शिबिरामुळे दोडामार्ग परिसरात आरोग्यसेवेचा संदेश पोहोचला. वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा हा उपक्रम नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणारा ठरला.
