कणकवली : तालुक्यातील हळवल ग्रामपंचायतीच्या परबवाडी प्रभाग क्रमांक ३ मधील सदस्य सान्वी गावडे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने येथे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या अनुषंगाने सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गौरी लवू परब यांनी तहसीलदार कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान यानंतर अन्य अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे गौरी परब यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड ही निश्चित झाली असून घोषणा होणे बाकी आहे.
यावेळी हळवलच्या सरपंच अपर्णा चव्हाण, शशिकांत राणे, ग्रा.स. सचिन ठाकूर, भाजपा कणकवली तालुका कार्यकारिणी सदस्य संतोष गुरव, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे, माजी उपसरपंच अरुण राऊळ, वागदे सरपंच संदीप सावंत, लवू परब, दीपेश परब, वामन परब, विकास गावडे, अनिकेत परब, सत्यवान गावडे, सान्वी गावडे, राजेंद्र गावडे, नंदू परब, समीर प्रभूगावकर, गिरीश परब, मनीष परब, पप्पू परब, मुन्ना गावडे, कैलास परब, मधुकर पाडावे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
