Headlines

Global Maharashtra Breaking News

ऑपरेशन ‘क्लीन सी’ अंतर्गत अवैध LED मासेमारीविरोधात कारवाई; देवगड येथील नौका जप्त…

⚡सिंधुदुर्ग, दि.१४-:मत्स्यव्यवसाय विभागामार्फत समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेंतर्गत आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नियमित गस्तीदरम्यान विजयदुर्ग समोरील समुद्रात अवैधरीत्या LED लाइट्सचा वापर करून मासेमारी करणारी ‘अमीना’ (AMINA) IND-MH-5-MM-647 ही नोंदणीकृत नौका जप्त करण्यात आली. सदर…

Read Full News

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…

⚡सावंतवाडी ता.१४-: राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करूनमानवंदना दिली जाते याही वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव,…

Read Full News

कणकवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

⚡कणकवली ता.१४-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली बसस्थानक शेजारील बुद्धविहाराला भेट देत पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित आंबेडकरी अनुयायांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. बुद्धविहार परिसरात उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा व त्यांचे विचार पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या विचारांचे वाचन करत त्यांनी हा नाविन्यपूर्ण…

Read Full News

वेंगुर्ला आगारातून शिरोडा वेंगुर्ला बोरिवली बसफेरी 15 एप्रिलपासून सुरु…

वेंगुर्लाबुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी पासून शिरोडा वेंगुर्ला चिपळूण बोरिवली बस फेरी सुरू करण्यात आली असून, शिरोडा वरून सायंकाळी ४.३० वाजता आणि वेंगुर्ला वरून सायंकाळी ५ वाजता सदर बस सोडण्यात येईल, तसेच ही बस बोरिवली वरून सायंकाळी ७ वाजता सोडण्यात येईल. गेले कित्येक दिवस फेरी सुरू करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य बंदरे विकास मंत्री…

Read Full News

खासदार राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न..!

सावंतवाडी, ता.१०: भारतीय जनता पार्टी आयोजित माननीय खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त “संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेदरम्यान शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष…

Read Full News

जितेंद्र गावकर यांच्या नेतृत्वाखाली मळगाव घाटीत स्वच्छता मोहीम यशस्वी…

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी तालुक्यातील माजगाव शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मळगाव घाटीतील कचऱ्याची समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून गंभीर बनली होती. या वाढत्या अस्वच्छतेची दखल घेत पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी माजगावातील तरुण युवकांना सोबत घेऊन मंगळवारी सकाळी मळगाव घाटीत विशेष स्वच्छता मोहीम राबवली. स्वयंप्रेरणेने राबवलेल्या या मोहिमेत तरुणांनी तब्बल २० गोणी कचरा गोळा करून परिसर स्वच्छ…

Read Full News

उन्हाळ्याच्या तीव्रतेत आरोग्याची काळजी घ्या-:डॉ. रविंद्र लिलके…

⚡वेंगुर्ला ता.१४-: उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ होत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन वेंगुर्ला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र लिलके यांनी आरोग्य विभागातर्फे केले आहे.   उष्णतेत झालेल्या वाढीमुळे दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे. पुरेसे आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे आणि हलके, सैल कपडे वापरावेत. उष्माघात टाळण्यासाठी डोके झाकून…

Read Full News

वेंगुर्ला तालुका ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणूकीसाठी 7 अर्ज दाखल…

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला तालुक्यातील 4 ग्रामपंचायत मधील रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.मंगळवार 7 एप्रिल ते सोमवार 13 एप्रिल या कालावधीत एकूण 7 अर्ज दाखल झाले आहेत.मठ, चिपी, परुळेबाजार व मेढा या 4 ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणूक मंगळवार 28 एप्रिल रोजी होणार आहे. मठ प्रभाग क्र. 2 (ना. मा. प्र. महिला ) –…

Read Full News

मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून होडावडा येथे विकासकामासाठी निधी मंजूर …

⚡वेंगुर्ला ता.१४-: जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून होडावडा हळदणकरवाडी ग्रामस्थ्यांची अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी पूर्ण करण्यात आली आहे.   शासनाच्या डोंगरी विकास निधी व नागरी जनसुविधा योजने अंतर्गत मंजूर झालेल्या (23 लाख निधी ) होडावडा हळदणकरवाडी रस्ता खडिकरण -डांबरीकरण कामाचे भूमिपूजन मनीष दळवी यांच्या हस्ते संपन्न  झाले. मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश…

Read Full News

सावंतवाडी भटवाडी भाग हायमस्टच्या दिव्यांनी प्रकाशमय. .

महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या प्रयत्नातून . ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी भटवाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या प्रयत्नातून आणि सिंधुदुर्ग चे लाडके पालकमंत्री सन्मा. श्री नितेशजी राणे साहेब यांच्या निधीतून भटवाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये सहा सोलर हायमस्ट बसविण्यात आले आहेत. या हायमस्टचे उद्घाटन सभापती दिपाली भालेकर यांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page