⚡कणकवली ता.१४-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली बसस्थानक शेजारील बुद्धविहाराला भेट देत पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित आंबेडकरी अनुयायांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
बुद्धविहार परिसरात उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा व त्यांचे विचार पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या विचारांचे वाचन करत त्यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल बुद्धविहार व्यवस्थापन मंडळाचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, महसूल विभागातील सेवानिवृत्त कारकून ममता तांबे, अंकुश कदम यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.
