वेंगुर्ला
बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी पासून शिरोडा वेंगुर्ला चिपळूण बोरिवली बस फेरी सुरू करण्यात आली असून, शिरोडा वरून सायंकाळी ४.३० वाजता आणि वेंगुर्ला वरून सायंकाळी ५ वाजता सदर बस सोडण्यात येईल, तसेच ही बस बोरिवली वरून सायंकाळी ७ वाजता सोडण्यात येईल. गेले कित्येक दिवस फेरी सुरू करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. सदर प्रश्नाबाबत तात्काळ दखल घेत, सदर बस फेरी सुरू करण्यात यावी अश्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासनाने सदर बस फेरी सोडण्याचे मान्य केले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे विभागीय अध्यक्ष संदेश सावंत , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा आगार अध्यक्ष बाळू देसाई साहेब, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष तथा आगार कार्याध्यक्ष पप्पू परब , जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ , जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे , सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ विभागीय सचिव भरत चव्हाण यांच्या पाठपुराव्याने सदर बस फेरी सुरू करण्यात आली. वेंगुर्ला आगार सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघातर्फे तसेच सर्व कर्मचाऱ्यानं तर्फे पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांनी सदर बसफेरी कायमस्वरूपी सुरू रहावी तसेच वेंगुर्ला तालुक्यातील प्रवाश्यांना सुरक्षित व आरामदायी सेवा देण्याचे मान्य करण्यात आले.
वेंगुर्ला आगारातून शिरोडा वेंगुर्ला बोरिवली बसफेरी 15 एप्रिलपासून सुरु…
