खासदार राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न..!

सावंतवाडी, ता.१०: भारतीय जनता पार्टी आयोजित माननीय खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त “संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

स्पर्धेदरम्यान शहर मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष हितेन नाईक, नगरसेवक तथा सभापती प्रतीक बांदेकर, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेवक तसेच लायन्स क्लब अध्यक्ष अमेय पई यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच खेळाडू संकेत राऊळ, शुभम मुळीक, अक्षय पंडित यांसह अनेक क्रीडाप्रेमींनी स्पर्धेला उपस्थिती लावली.स्पर्धेचे आयोजन उत्कृष्टरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे —

१३ वर्षाखालील मुले: प्रथम रौनक कांबळी, द्वितीय श्री सारंग, तृतीय आमीन निकारी व श्लोक परब.
१७ वर्षाखालील मुले: प्रथम ध्रुव कामत, द्वितीय प्रीत शेट्टीगर, तृतीय लौकिक तळवडेकर व फरहान.
खुला गट (मुले): प्रथम इशान वेंगुर्लेकर, द्वितीय प्रीत शेट्टीगर, तृतीय गौतम वाडकर व चंदू साळवे.
खुला गट (मुली): प्रथम वर्षा परुळेकर, द्वितीय प्राची चव्हाण, तृतीय धनश्री परब व साई कांबळे.
दुहेरी खुला गट: प्रथम इशांत शेट्टीगर, द्वितीय चंदू साळवे, तृतीय पंकज तुळसुळकर – राजाराम वालावलकर तसेच साहिल पारकर – अतुल गवस.

You cannot copy content of this page