⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला तालुक्यातील 4 ग्रामपंचायत मधील रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.मंगळवार 7 एप्रिल ते सोमवार 13 एप्रिल या कालावधीत एकूण 7 अर्ज दाखल झाले आहेत.
मठ, चिपी, परुळेबाजार व मेढा या 4 ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणूक मंगळवार 28 एप्रिल रोजी होणार आहे. मठ प्रभाग क्र. 2 (ना. मा. प्र. महिला ) – कविता आशिष घोलेकर, पूनम नरेश बोवलेकर. प्रभाग क्र. 3 ( सर्वसाधारण स्त्री )- सुप्रिया सुशांत गावडे, दर्शना दिनेश नाईक. परुळेबाजार : प्रभाग क्र 3 (सर्वसाधारण स्त्री ) – रश्मी वासुदेव सामंत, अपेक्षा अंकुश दादगे. चिपी :प्रभाग क्र. 3 (सर्वसाधारण ) – संदेश चंद्रकांत करंगुटकर.
मेढा : प्रभाग क्र.2(सर्वसाधारण ) – निरंक.
असे नामनिर्देशनपत्र अर्ज दाखल झाले आहेत. बुधवार 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. पासून छाननी, शुक्रवार 17 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी, मंगळवार 28 एप्रिल रोजी आवश्यकतेनुसार मतदान व बुधवार 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
वेंगुर्ला तालुका ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणूकीसाठी 7 अर्ज दाखल…
