⚡वेंगुर्ला ता.१४-: जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून होडावडा हळदणकरवाडी ग्रामस्थ्यांची अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी पूर्ण करण्यात आली आहे.
शासनाच्या डोंगरी विकास निधी व नागरी जनसुविधा योजने अंतर्गत मंजूर झालेल्या (23 लाख निधी ) होडावडा हळदणकरवाडी रस्ता खडिकरण -डांबरीकरण कामाचे भूमिपूजन मनीष दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले. मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी काम मंजूर करून दिल्याबद्दल होडावडा गावाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
हा निधी मंजूर करण्यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी विशेष प्रयत्न केले. या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम आज सोमवारी भाजपा मंडळ अध्यक्ष विष्णू परब, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनीष दळवी यांचे हस्ते पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी होडावडा गावातील ट्रान्सफॉर्मर, रस्ते, शाळा दुरुस्ती व कंपाउंड वॉल , बंधारे, अंगणवाडी दुरुस्ती,अशा वीविध विकासकामासाठी सुमारे 1 कोटी 80 लाख निधी मंजूर केल्याबद्दल उपसरपंच राजबा सावंत यांनी आभार व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद दळवी, अनन्या धावडे, शैलजा साळगावकर, संदीप सातार्डेकर, भाजपा तालुका चिटणीस नितीन चव्हाण, अण्णा वजराटकर, प्रकाश परब, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर नाईक, माजी सरपंच दिगंबर दळवी, सोसायटी संचालक विजय होडावडेकर, राघोबा दळवी, माजी चेअरमन चंद्रकांत दळवी, तळवडा सदस्य दादा परब, होडावडा भाजप बूथ अध्यक्ष प्रसाद परब, शिरीष साळगावकर, भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून होडावडा येथे विकासकामासाठी निधी मंजूर …
