Global Maharashtra Breaking News

मिठबाव फिशिंग सोसायटीच्या वतीने मच्छिमारांनी शासनाच्या योजनांचे लाभ घेण्याचे सूतोवाच

*⚡देवगड ता.१९-:* मच्छिमार बांधवांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा ! त्यासाठी आम्ही अधिकारी वर्ग सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. फक्त आपण आपल्या समस्या मोकळेपणाने मांडाव्यात असे मत्स्यव्यवसाय अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी देवगड तालुक्यातील तांबळडेग येथे मिठबाव फिशिंग अँड ट्रेडिंग को-ऑप. सोसायटीच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मच्छिमार बांधवाना मार्गदर्शन करताना मालवणकर बोलत…

Read More

शासनाने अंत न पाहता एस.टी.कर्मचाऱ्यांना वेळीच न्याय द्यावा

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे प्रतिपादन *⚡कणकवली ता.१९-:* एस.टी. कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठीच आहे. त्यांना न्याय देण्याअगोदरच संप मोडीत काढणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार म्हणावा लागेल. शासनाचे हे कामगार विरोधी धोरण लक्षात घेऊन प्रत्येक कर्मचारी व प्रवासी जनतेने आता मोठी चळवळ उभी केली पाहीजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद घेऊन…

Read More

कै. सत्यविजय भिसे यांच्या स्मृती दिनानिमित्त २२ नोव्हेंबर रोजी शिवडाव येथे रक्तदान शिबीर…

*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली तालुक्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते कै. सत्यविजय भिसे यांचा १९ वा स्मृतीदिन सोमवार २२ नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. त्यातील एका उपक्रमाअंतर्गत शिवडाव येथील कै.सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गेली १९ वर्षे कै. सत्यविजय भिसे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून अनेक सेवाभावी व सामाजिक उपक्रम…

Read More

डीपीडीसीचा कमी केलेला निधी तरी मिळेल का?

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा सवाल *⚡कणकवली ता.१९-:* निधीअभावी राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः खिळखिळी झाली आहे. नर्सेस, चतुर्थ श्रेणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सहा महिने झाले अजून पगार मिळाला नाही. आरोग्यासाठीच्या ६६७ कोटींच्या पॅकेजपैकी केवळ १४८ कोटी दिल्याने अनेक डॉक्टरांनी काम बंद केले आहे. खनिकर्ममधून घेतलेल्या आणि श्रेयवादातअडकलेल्या रुग्णवाहीकांना डिझेल नाही, चालक नाहीत, अशी स्थिती आहे. डीपीडीसीचा…

Read More

स्व.सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथे विविध कार्यक्रम

*⚡कणकवली ता.१९-:* स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट तळेरे व स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २६ नोव्हेंबर २०२१ स.९.३० वा विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.१० वी.१२.वी विद्यार्थी बक्षिस वितरण समारंभ तसेच आकाश कंदील स्पर्धेचा…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंब्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी बंद पाळावा

रिक्षा चालक-मालक संघटनेचे आवाहन *⚡कणकवली ता १९-:* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत विलीनीकरणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला रिक्षा चालक मालक संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. यात कणकवली शहरातील रिक्षा चालक-मालक यांच्या सोबत खाजगी प्रवासी वाहन, सहा सीटर, मॅजिक यांनीही सहभागी होत पाठिंब्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी बंद पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. एसटी…

Read More

मालवण येथील विकासकामांसाठी 7 कोटीचा निधी राज्य शासनाकडून मंजूर…

मालवण दि प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मालवण शहरासाठी ७ कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. यामध्ये दोन कोटींचा निधी रस्ते विकासासाठी वापरला जाणार असून ५ कोटींचा निधी शहरातील मत्स्यालयासाठी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी मत्स्यालयासाठी मंजूर केलेला ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याने मत्स्यालयासाठी एकूण…

Read More

लोककलेला ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी मालवण येथे लोककला महोत्सवाचे आयोजन…

मालवण, दि प्रतिनिधी लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी येथील पंचायत समितीच्या वतीने २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत मालवण पंचायत समिती आवार येथे लोककला महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. या लोककला महोत्सवाचे उद्घाटन २२ रोजी माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे वृद्ध व उपेक्षित कलाकारांना वाव मिळावा तसेच लोककलावंतांना…

Read More

अखेर बळीराजाने मोदी सरकारला नमवले – अरविंद मोंडकर

*⚡मालवण ता.१९-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्याने गेले वर्षभर दिल्ली सीमेवर ठाण मांडून आंदोलन करत असलेल्या देशातील बळीराजाचा विजय झाला आहे. अखेर बळीराजाने मोदी सरकारला नमवले आहे, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. केंद्रातील मोदी सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले असून शेतकऱ्यांनी सरकारला अन्यायकारक…

Read More

मालवणात २८ रोजी मोफत हृदयविकार शिबीर

*⚡मालवण ता १९-:* कोल्हापूर येथील अथायु हॉस्पिटल व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान-सिंधुदुर्ग शाखा मालवणतर्फे मोफत हृदयविकार व दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन शिबीर २८ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत येथील दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. डॉ. सिधनगौड़ा मालिबिरादर (एमबीबीएस, एमडी, मेडिसीन, डीएम, कार्डिओलॉजी), डॉ. राहुल पाटील (मुत्रविकार तज्ज्ञ) हे उपचार करणार आहेत….

Read More
You cannot copy content of this page