मणेरी सातेरी देवी मंदिरात आज घडली चोरी; दोडामार्ग तालुक्यातील मंदिरे चोरट्यांच्या लक्षावर
दोडामार्ग ता.११ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच आहे मंदिरातील घंटा, फंडपेट्या, लांबवल्याची घटना सर्रासपणे तालुक्यात चालूच याला तात्काळ आळा बसण्याऐवजी चोरीच्या घटना वाढतच आहे. आज चोरीची घटना मणेरी सातेरी देवी मंदिरात घडली.
सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी मणेरी व आसपासच्या परिसरात चोरी सत्र सुरू होते यावेळी अज्ञात चोरट्यानी मंदिरांना लक्ष केले होते. त्यावेळी मंदिरातील लोखंडी घंटा तसेच फंडपेट्या चोरट्यानी लांबवल्या होत्या. हे सत्र चालू असतानाच मणेरी येथील सातेरी देवीच्या मंदिराचा दरवाजा फोडून चोरट्यानी घंटा तसेच मिक्सर पळवल्याची माहिती गावचे मानकरी भगवान गवस यांनी दिली आहे.मात्र या घटनेनंतर पोलिसांसमोर या घटना रोखण्याचे आव्हान आहे दोडामार्ग पोलीस याबाबत काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.
