आगामी निवडणुकीसाठी संघटना मजबूत करण्यासाठी उद्या भाजपची सावंतवाडीत बैठक

राजन तेली;२०२४ साली महाराष्ट्रात भाजप स्वबळावर एक हाती सत्ता आणणार…

सावंतवाडी ता.११ आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्यासाठी तसेच निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उद्या सावंतवाडी येथे बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले की, कालच ५ राज्याचा विधानसभा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये भाजपने चार राज्यात मोठे यश संपादन केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. यावेळी गोवा राज्याची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली होती. यामध्ये त्यानी यश मिळवत तब्बल २० आमदार निवडून आणले आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार असल्याचा विश्वास राजन तेली यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page