कणकवली ता.११-:* रत्नागिरी-देवरुख येथील डी-कॅड कलामहाविद्यालया ‘अपरान्त’ चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते या चित्र प्रदर्शनाचे औचित्य साधून विद्यामंदिर प्रशालेचे कला शिक्षक प्रसाद राणे यांना कला गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे
कलाक्षेत्रासाठी आपल्या शाळेमध्ये व सिंधुदुर्गात विविध उपक्रम राबवून अनेक विद्यार्थी घडविल्याबद्दल व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामाची दखल घेऊन विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे कला शिक्षक प्रसाद राणे रत्नागिरी-देवरुख येथील डी-कॅड कला कलामहा विद्यालयातर्फे कला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे, अजय पित्रे, विजय बिरकर, चित्रकार संजय ट्विंकल, रणजित मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. राणे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी. डी. कामत, सचिव विजयकुमार वळंजू, मुख्याध्यापक बी. डी. सरवदे, पर्यवेक्षक पी. जी. कांबळे, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी त्यांचे अभिनंदन केले.
