परब मराठा समाजातील महिलांनी उत्कर्ष साधावा

उपाध्यक्ष दीपक परब यांचे आवाहन

मालवण ता.११-:* आज जवळपास सर्वच क्षेत्रात महिला पुढे आहेत. पुरुषांच्या बरोबरीने त्या समाजात वावरत आहेत. परब मराठा समाजातील महिलांनी सुद्धा उत्कर्ष साधावा व यासाठी समाजातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व पदाधिकारी पुढे असतील असे प्रतिपादन परब मराठा समाजाचे उपाध्यक्ष तथा उद्योजक डॉ दीपक परब यांनी मुंबई येथे केले. परब मराठा समाज मुंबई यांच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दादर-मुंबई येथे करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय मल्लखांब पटू अर्जुन पुरस्कार विजेती कुमारी हिमानी उत्तम परब हिचा संस्थेचे उपाध्यक्ष तथा उद्योजक श्री दिपक परब यांच्या हस्ते तर नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियन २०२१ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या सौ. रिना बाबा परब हिचा सौ. भारती हेगडे परब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्था उपाध्यक्ष उद्योजक दीपक परब, सरचिटणीस जी. एस परब, चिटणीस श्री प्रमोद बाळकृष्ण परब, महिला संघटक सौ प्रतिक्षा प्रमोद परब,सौ. भारती हेगडे परब, महिला संघटक सौ. प्रतिक्षा प्रमोद परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page