खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय वार्षिक आरोग्य तपासणी

कणकवली ता.११-:* खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय कणकवलीचे डॉ.सुरज कुडतरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शाळेतील एकूण १२९ विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी करण्यात आली.

यावेळी डॉ.प्रतिमा आबदार,आरोग्यसह्ययिक श्रीम प्राप्ती सावंत,फार्मासिस्ट श्री आदित्य काजरेकर खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर आदी उपस्थित होते. शासनाच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थी वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात आली.यामध्ये खारेपाटण केंद्रशाळेतील इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या वर्गातील ६७ मुलगे व ६२ मुली असे मिळून एकूण १२९ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

खारेपाटण केंद्राअंतर्गत येणाऱ्या काही इतर जि प शाळेतील विद्यार्थ्यांची व अंगणवाडी केंद्रातील बालकांची तपासणी करण्यात आली.

You cannot copy content of this page