वैभववाडी प्रतिनिधी देवगड तालुका मर्यादित पहिली वहिली पेंढरी बॉईज आयोजित “पेंढरी चषक 2022” टेनिसबॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक 13 मार्च, रविवार आयोजित करण्यात आली आहे.
गेली दोन वर्षे ज्या स्पर्धेची आतुरतेने देवगड तालुक्यातील क्रीडाप्रेमी स्पर्धक, खेळाडू, आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो दिवस जवळ आला. दिनांक 13 मार्च रविवार या दिवशी देवगड तालुक्यातील मजबूत 16 संघ विरार येथील तपस्या मैदानावर एकमेकांसमोर उभे राहतील. विजेता कोण, तपस्या मैदानावर कोणत्या संघाच्या मेहनतेची तपस्या विजयी स्वरूपात पूर्ण होणार याकडे तालुक्यातील संपुर्ण क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रामीण भाग ते शहर अश्या शेकडो मैलाचे अंतर, वेडी-वाकुडे वळणे, चढ-उतार पार करत ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पेंढरी बॉईज चे खेळाडू अथक मेहनत घेताना दिसत आहेत. या स्पर्धेत भव्य दिव्य अश्या चषकांचा परितोषिकांचा वर्षाव होणार आहे. गावातील, तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत आहेत. पहिली वहिली आयोजित पेंढरी बॉईज *पेंढरी चषक 2022* स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रीडाप्रेणींनी उपस्थित राहावे, खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, खेळाडूंचे मनोधैर्य वाढवावे यासाठी पेंढरी बॉईज खेळाडूंकडून सर्व क्रीडा रसिकांना आवाहन करण्यात येत आहे.
