मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील दांडी देव पाणंद समुद्रकिनारी कमलेश कोचरेकर रापण संघ व अन्य सदस्य दांडी मालवण यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या क्यार, महाचक्रीवादळामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करू न शकलेल्या सागरी मच्छीमारांसाठी राज्य सरकारने ऑगस्ट २०२० मध्ये ६५ कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते.
या आर्थिक पॅकेजपासून वंचित राहिलेल्या रापण व्यावसायिक मच्छीमारांनी दांडी समुद्रकिनारी गुरुवारी सकाळपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. कमलेश कोचरेकर रापण संघ आणि वाईरकर रापण संघाचे सदस्य या उपोषणात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत १९४ वंचित लाभार्थ्यांच्या खात्यात मत्स्य पॅकेजचे पैसे जमा होत नाहीत तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा मच्छीमारांनी घेतला आहे.
यावेळी कमलेश कोचरेकर, नरेश कोचरेकर, जैशिर पराडकर, नारायण लोणे, कौस्तुभ मालंडकर, अमित खवणेकर, जगदीश खराडे, कौशल तारी हे उपस्थित होते.
