Headlines

Global Maharashtra Breaking News

मोटारसायकल व सुमो गाडीच्या धडकेत तरुण जखमी

मालवण ता.१८-:* मालवण देऊळवाडा येथील महापुरुष मंदिराच्या अवघड वळणाच्या उताराच्या रस्त्यावर मोटारसायकल व टाटा सुमो गाडी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी घडली. जखमी तरुणाला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मालवण देऊळवाडा येथील महापुरुष मंदिराकडील उताराचा रस्ता हा अवघड वळणाचा आहे. याच वळणाच्या…

Read More

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे २८ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

आम. दिपक केसरकर यांची माहिती सावंतवाडी ता.१८-:* पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आसल्याची माहीत आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वेंगुर्ला येथील अनेक विकास कामांची उद्घाटने होणार असून, रत्नसिंधू योजनेचे लोकार्पण…

Read More

“त्या” अधिकाऱ्यावर हक्कभंगाची कारवाई करणार…

आमदार दीपक केसरकर; शेतकऱ्याची दिशाभूल करण्यासाठी “ती” बैठक .. सावंतवाडी ता.१८-:* आंबोली येथील कबुलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांन मार्फत बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले असताना देखील, कोकण आयुक्तांनी घेतलेली बैठक ही चुकीची आहे. या बैठकीला आपणाला बोलवण्यात आले नाही असा आरोप आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. त्या…

Read More

कणकवलीत शिमगोत्सवाची धामधूम मांडावर रंगणार सोंगाचे कार्यक्रम

कणकवली ता१८-:* कोरोनामुळे मागील दोन वर्षात शिमगोत्सव सण अगदी साधे पणाने साजरा करण्यात आला.यंदा कोरोना परस्थिती निवळल्याने कणकवली शहरासह गावा गावात शिमगोत्सवाची धामधूम पाहवयास मिळत आहे. कोकणातील शिमगोत्सव हा मोठा सण मानला जातो.या उत्सवात गावा गावातील मांडावर सोंगे,कोळी गीत या सोबतच रोंबाट काढले जाते. गुरुवारी सायंकाळी कणकवली शहरातील गाव होळीचे पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात…

Read More

स्वतःच्या गावात ब्रिज बांधू शकत नाही ते काय तालुक्याच राजकारण करणार…?

दिपक केसरकर; नाव न घेता संजू परब यांच्यावर टिका सावंतवाडी ता.१८-:* मडुरा येथील ब्रिज बांधण्यात येईल असे जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी आश्वासन दिले होते. परंतु ते ब्रीज ते करू शकले नाहीत. त्यामुळे “त्या” ब्रिजला मंजुरी मी स्वतः मिळवून आणली आहे. त्या गावातील रहिवाशी असलेल्यांना ‘तो’ ब्रीज बांधता आला नाही ते शहराच व तालुक्याच राजकारण काय…

Read More

वेंगुर्ल्यात उत्साहात होळीचे पूजन

वेंगुर्ला ता.१८-:* वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारपासून होळी उत्सवाला प्रारंभ झाला असून गुरुवारी व शुक्रवारी प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आंब्याची व सुपारीच्या झाडाची म्हणजेच पोफळीची होळी घालण्यात आली. शुक्रवारी विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमीही साजरी करण्यात आली. कोकणात इतर सणांबरोबरच होळी सणाला फार महत्त्व आहे. गुरुवारी सायंकाळी ७ नंतर होळी उत्सवाला प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात आंब्याच्या पोफळीच्या…

Read More

सहकार नेते दिनानाथ वेणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

वेंगुर्ला ता.१८-:* वेंगुर्ला उभादाडा येथील रहिवासी सागरेश्वर जवळील दर्या राज बीच रिसॉर्टचे मालक कॉग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते व सहकार नेते दिनानाथ वेणेकर याचे वयाच्या ६२ वर्षी आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले माजी खासदार व ब्रिगेडियर सुधीर सावंत याचे कट्टर समर्थक म्हणून दिनानाथ वेणेकर याची ओळख होती त्यांनी सुधीर सावंत यांच्या समवेत राजकारणात सुरुवात केली…

Read More

गेट’ परिक्षेत सौरभ गवंडेचे सुयश

सावंतवाडी ता.१८-:* नुकत्याच पार पडलेल्या व निकाल जाहीर झालेल्या गेट 2022 परिक्षेत सिंधुदुर्ग सुपत्र सौरभ संदिप गवंडे याने घवघवीत यश संपादन केले व संपूर्ण भारतात ऑल इंडिया रॅन्कमध्ये वीसावा क्रमांक पटकावला. कुडाळ येथील सौरभ गवंडे याने गेट परिक्षेत 100 गुणांपैकी 87.95% गुण मिळविले. कुडाळ हायस्कूलचा विद्यार्थी सौरभ याने बारावी नंतर ‘व्हीजेटीआय’ माटुंगा मुंबई येथे सिव्हील…

Read More

कणकवली, देवगड मध्ये नवीन 23 धरण प्रकल्पांसाठी सर्वेक्षण करणार

शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या मागणीचा खा.विनायक राऊत यांनी केला पाठपुरावा कणकवली ता१८-:* कणकवली व देवगड तालुक्यातील जास्तीतजास्त जमीन ओलिताखाली यावी यासाठी लघू सिंचन धरण प्रकल्पांची आवश्यकता आहे. यासाठी कणकवली तालुक्यातील 9 व देवगड तालुक्यातील 14 ठिकाणी धरण प्रकल्प उभारता येणे शक्य आहे. त्यामुळे या नवीन धरणांसाठी सर्व्हेक्षण व्हावे अशी मागणी शिवसेना नेते सतीश सावंत…

Read More

मळेवाड येथे निम्या किंमतीत घरघंटी आणि वॉटर फिल्टरचे वितरण…

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला उपक्रम सावंतवाडी ता.१८-:* भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मळेवाड येथे निम्म्या किंमतीतील घरघंटी व वॉटर फिल्टर चे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. भाजप चे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून निम्म्या किंमतीतील मागेल त्याला घरघंटी व वॉटर फिल्टर योजना सुरू करण्यात आली होती….

Read More
You cannot copy content of this page