आमदार दीपक केसरकर; शेतकऱ्याची दिशाभूल करण्यासाठी “ती” बैठक ..
सावंतवाडी ता.१८-:* आंबोली येथील कबुलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांन मार्फत बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले असताना देखील, कोकण आयुक्तांनी घेतलेली बैठक ही चुकीची आहे. या बैठकीला आपणाला बोलवण्यात आले नाही असा आरोप आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
त्या अधिकाऱ्यांवर हक्क भंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा देताना त्यांनी कोणतेही अधिकाऱ्याची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा उद्देशाने ही बैठक घेतली असल्याचा आरोप त्यांनी राजन तेली याचे नाव न घेता केला आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, आपण अधिकाऱ्यांचा मान राखतो परंतु, त्यांनी देखील आपल्या मर्यादा सांभाळून वागावे, राजकारणात पडू नये. आंबोली येथील हा प्रश्न सुटून त्या गावकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळणे गरजेचे असून, त्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
