पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे २८ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

आम. दिपक केसरकर यांची माहिती

सावंतवाडी ता.१८-:* पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आसल्याची माहीत आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वेंगुर्ला येथील अनेक विकास कामांची उद्घाटने होणार असून, रत्नसिंधू योजनेचे लोकार्पण करण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे मत आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page