वेंगुर्ला ता.१८-:* वेंगुर्ला उभादाडा येथील रहिवासी सागरेश्वर जवळील दर्या राज बीच रिसॉर्टचे मालक कॉग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते व सहकार नेते दिनानाथ वेणेकर याचे वयाच्या ६२ वर्षी आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले माजी खासदार व ब्रिगेडियर सुधीर सावंत याचे कट्टर समर्थक म्हणून दिनानाथ वेणेकर याची ओळख होती त्यांनी सुधीर सावंत यांच्या समवेत राजकारणात सुरुवात केली ते प्रथम युवक कॉग्रेसचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष, जिल्ह्या युवक जनरल सेक्रेटरी नंतर वेंगुर्ला कॉग्रेस तालुकाध्यक्ष, कॉग्रेसचे माजी जिल्ह्या जनरल सेक्रेटरी या पदावर होते अनेकविकासकमे त्यांनी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणली राजकारणातच त्यांनी सहकाराची कास धरली सी. स.सावंत सह्यादी काजू सहकारी संस्था चेअरमन, जीवन सिधु नागरी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष , भंडारी नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन त्यानंतर जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी सिधु सागर पर्यटन संस्था स्थापन केली.
त्यावर चेअरमनपदी काम करीत दर्या राजा बीच रिसॉर्ट काढून पर्यटन व्यवसायात यशस्वी काम करत होते त्याच बरोबर शिक्षण क्षेत्रात काम करताना न्यु इंग्लिश हायस्कुलच्या अध्यक्षपदी काम केले सुधीर सावंत यांच्या छत्रपती शिवाजी महाराज किर्लोस कृषी केंद्दाच्या सेक्रेटरी पदी काम पाहिले हे करतानाच त्यांनी उत्तम पध्दतीने एल आय सी विमा प्रतिनिधी म्हणून काम केले अशासकीय खादी ग्रामोद्योग कमिटी संचालक व इतर शासनाच्या अशासकीय कमितीवर काम केले सुधीर सावंत याचे कट्टर समर्थक असल्याने सावंत यांनी कॉग्रेसमधून आपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी जिल्ह्या जनरल संकेतरी म्हणून काम पाहिले होते
निस्वार्थीपणे त्यांनी राजकारण खऱ्या अर्थाने समाजकारण म्हणून केले त्यामुळे त्याचे सहकार ,पर्यटन व शिक्षण या क्षेत्रात काम करीत वेगळा लौकिक मिळविला आज त्याच्या पच्छात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे एस एम हायस्कुल कणकवलीच्या निवृत्त शिक्षिका नेहा वेणेकर याचे ते पती होत दिनानाथ वेर्णकर याची शोकसभा 25 रोजी वेंगुर्ला दर्या राजा बीच रिसॉर्टवर 25 मार्च रोजी सकाळी 10 वाजता माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत दिनानाथ वेंर्णकर याच्या शोकसभेचे आयोजन
