गेट’ परिक्षेत सौरभ गवंडेचे सुयश

सावंतवाडी ता.१८-:* नुकत्याच पार पडलेल्या व निकाल जाहीर झालेल्या गेट 2022 परिक्षेत सिंधुदुर्ग सुपत्र सौरभ संदिप गवंडे याने घवघवीत यश संपादन केले व संपूर्ण भारतात ऑल इंडिया रॅन्कमध्ये वीसावा क्रमांक पटकावला.

कुडाळ येथील सौरभ गवंडे याने गेट परिक्षेत 100 गुणांपैकी 87.95% गुण मिळविले. कुडाळ हायस्कूलचा विद्यार्थी सौरभ याने बारावी नंतर ‘व्हीजेटीआय’ माटुंगा मुंबई येथे सिव्हील इंजिनिअरिंग बी.टेक चे शिक्षण पूर्ण केले. त्याला तज्ज्ञ शिक्षकांबरोबरच आई सुषमा यांचे मार्गदर्शन मिळाले. सिंधुदुर्ग सुपत्र सौरभ याच्या ‘गेट’ 2022 या परिक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page