स्वतःच्या गावात ब्रिज बांधू शकत नाही ते काय तालुक्याच राजकारण करणार…?

दिपक केसरकर; नाव न घेता संजू परब यांच्यावर टिका

सावंतवाडी ता.१८-:* मडुरा येथील ब्रिज बांधण्यात येईल असे जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी आश्वासन दिले होते. परंतु ते ब्रीज ते करू शकले नाहीत. त्यामुळे “त्या” ब्रिजला मंजुरी मी स्वतः मिळवून आणली आहे. त्या गावातील रहिवाशी असलेल्यांना ‘तो’ ब्रीज बांधता आला नाही ते शहराच व तालुक्याच राजकारण काय करणार..? आशी टिका आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब यांच नाव न घेता केली आहे.

यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ माजी जेष्ठ नगरसेवीका अनारोजीन लोबो माजी नगरसेवक बाबू कुडतरकर,माजी नगरसेवक राजन पोकळे,इन्सुली माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण राणें आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page