Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेवर भाजप पुरस्कृत पॅनलचे वर्चस्व…

१३ पैकी १३ जागांवर एकतर्फी विजय… आंबोली ता.१९-:आंबोली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंच वार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार वैभव पॅनलने एकहाती सत्ता आणली असून, १३पैकी १३ सदस्य वैभव पॅनलचे विजयी झाले आहेत.

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यवसायिक सहकारी संस्थेची उद्या सभा

मालवण ता.१९-:* सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्थेची नववी सर्वसाधारण सभा रविवार दि. २० मार्च रोजी सकाळी १० वाजता तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष सौ. स्नेहा जितेंद्र केरकर व उपाध्यक्षा सौ. श्वेता हुले यांनी केले आहे.

Read More

गानकोकिळा लता मंगेशकर यांना वाहण्यात आली गीत श्रद्धांजली…

बॅ.नाथ पै सेवांगण कट्टा व आदर्श संगीत विद्यालय यांच्या वतीने वाहण्यात आली श्रद्धांजली मालवण ता.१९-:* गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा व आदर्श संगीत विद्यालय कट्टा यांच्या वतीने गीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लतादीदींची विविध गाणी सादर करत यावेळी त्यांच्या संगीत आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बॅरिस्टर…

Read More

मालवण आगारातून मुंबई, रत्नागिरी साठी जाणाऱ्या बस फेऱ्या सुरू…

मालवण (प्रतिनिधी) मालवण आगारातून सकाळी ८ वाजता मालवण- मुंबई अशी बसफेरी तर मुंबईवरून पहाटे ४ वाजता मुंबई – मालवण अशी बसफेरी सुरू करण्यात आली आहे. तर मालवण आगारातून सकाळी साडे आठ वाजता सुटणारी मालवण – रत्नागिरी ही पूर्वी प्रमाणे पूर्ववत करण्यात आली असून ती सकाळी ६ वाजता सोडण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मालवण…

Read More

वझरे गावात हजारो भाविकांच्या उपस्थितीत गाडा उत्सव साजरा

दोडामार्ग ता.१९-:* वझरे गावात गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेली शिमगोत्सव मधिल गाडा उत्सव ( दोरी बांधून रथ ओढणे) ही परंपरा आजही जोपासली जात आहे.शेकडो वर्षांपूर्वी वझरे गावातील गवस कुटुंब ग्रामस्थ यांच्यावर मेशांनी जबरदस्त जुलमी अन्याय अत्याचार केला याचा बिमोड करण्यासाठी गमिनी काव्यानी लढा देऊन मेशांचा नायनाट करुन विजय प्राप्त केला या विजयाचे प्रतीक म्हणून वझरे…

Read More

बांद्यातून आजऱ्याला कत्तलीसाठी नेणाऱ्या गुरांना जीवदान

स्थानिकांनी टेम्पो चालकाला दिला चोप : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावरील प्रकार सावंतवाडी ता.१९-:* बांदा येथून सावंतवाडी मार्गे आजरा येथे गुरे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला स्थानिकांनी रोखून चालकाला चांगलाच चोप दिला. यावेळी चालकाने ही गुरे आजरा येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. हा प्रकार आज येथील उपजिल्हा रुग्णालय समोरील रस्त्यावर घडला. त्यानंतर त्या गुरांना मोकळ्या परिसरात…

Read More

आम.नितेश राणे व गोट्या सावंत यांचे कणकवलीत केले स्वागत

कणकवली ता.१९-:* संतोष परब हल्ला प्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले आमदार नितेश राणे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना कणकवली तालुका प्रवेश बंदी करण्यात आली होती. १६ मार्च रोजी त्यांनी चार्टशीट दाखल केल्यानंतर कणकवली प्रवेशाचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आज आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत हे कणकवलीत दाखल झाले. यावेळी…

Read More

मनसेतर्फे किल्ले सिंधुदुर्गवर होणार शिवजन्मोत्सव सोहळा

मालवण ता.१९-:* तिथीप्रमाणे येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मनसेतर्फे शिवजन्मोत्सव म्हणून मालवणात २१ मार्च रोजी ढोल ताशांच्या मिरवणुकीने तसेच मोटरसायकल रॕलीने साजरी होणार आहे. या मोटरसायकल रॕलीची सुरुवात पिंगुळी कुडाळ येथुन कुडाळ शहर नंतर ओरोस येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवराजेश्वर मंदिरातील महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन व पुष्पहार अर्पण मनसे नेते…

Read More

सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास जनजागृती फलक

मालवण ता.१९-:* हिंदुत्वाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाबाबत जनजागृती करण्यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेकडून ३ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत बलिदान मास पाळला जात आहे. छत्रपती संभाजी राजेंच्या बलिदान मासचे महत्व समस्त शिवप्रेमी आणि हिंदूंना समजावे, यासाठी येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिराबाहेर सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत आणि शिवप्रेमींच्या वतीने…

Read More

राष्ट्रवादी आयोजित ई श्रमकार्ड नोंदणी व युनिव्हर्सल पास सुविधेचा शुभारंभ

मोफत सेवेचा २७ मार्च पर्यंत मिळणार लाभ;लाभ घेण्याचे अर्चना घारे-परब यांचे आवाहन सावंतवाडी ता.१९-:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी शहरात ‘मोफत ई- श्रम कार्ड नोंदणी आणि मोफत युनिवर्सल पास’ची मोफत सुविधा शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १९ मार्च ते २७ मार्च पर्यंत स. १० ते सायं. ५…

Read More
You cannot copy content of this page