बॅ.नाथ पै सेवांगण कट्टा व आदर्श संगीत विद्यालय यांच्या वतीने वाहण्यात आली श्रद्धांजली
मालवण ता.१९-:* गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा व आदर्श संगीत विद्यालय कट्टा यांच्या वतीने गीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लतादीदींची विविध गाणी सादर करत यावेळी त्यांच्या संगीत आठवणींना उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर ,कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, मंगलताई परूळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, शाखाध्यक्ष किशोर शिरोडकर, आदर्श संगीत विद्यालयाचे संचालक अर्जुन पेंडुरकर , भाऊ शिरोडकर ,डॉक्टर सोमनाथ परब ,मामा माडये, बापू तळावडेकर ,संजय पेंडूरकर , वैष्णवी लाड, बाळकृष्ण नांदोसकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लता मंगेशकर यांच्यासह अभिनेते स्व.रमेश देव, लोकराजा सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर शिरोडकर यांनी केले. या गीत श्रद्धांजली कार्यक्रमात आदर्श संगीत विद्यालयाच्या वतीने लतादीदींनी गायलेली बहारदार, चिरस्मरणीय गाणी व रमेश देव यांच्यावर चित्रित झालेली गाणी सादर केली.
नाम गुम जायेगा ,सुंदरते ध्यान, संधीकाली या अशा ,ए मेरे वतन के लोगो, सांग कधी कळणार तुला , माझे राणी माझे मोगा अशी अनेक बहारदार गाणी आदर्श संगीत विद्यालयचे सदस्य प्रितम गुराम ,रवीना पांजरी, ऋषिकेश चव्हाण, स्वरा पेंडुरकर यांनी सादर केली. या सर्व गीतांना संगीत साथ दिली हार्मोनियम- प्रतीक कोतिवडेकर, सिंथेसाइजर- महेश तळगावकर व ओंकार कासकर ,तबला- अर्जुन पेंडुरकर, ढोलकी-भगवान काळसेकर, साईड रिदम- अरविंद वराडकर ऑक्टोपॅड- हर्षद खराडे यांनी दिली. तर कोरस प्रसाद पेंडुरकर व कुणाल परुळेकर यांनी दिला. कार्यक्रमाचा शेवट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रायटनच्या समुद्रकिनार्यावर लिहिलेल्या आणि अंगावर रोमांच उभे करणाऱ्या ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला…. या गाण्याने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नाईक यांनी केले.
