मालवण ता.१९-:* सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्थेची नववी सर्वसाधारण सभा रविवार दि. २० मार्च रोजी सकाळी १० वाजता तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष सौ. स्नेहा जितेंद्र केरकर व उपाध्यक्षा सौ. श्वेता हुले यांनी केले आहे.
