स्थानिकांनी टेम्पो चालकाला दिला चोप : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावरील प्रकार
सावंतवाडी ता.१९-:* बांदा येथून सावंतवाडी मार्गे आजरा येथे गुरे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला स्थानिकांनी रोखून चालकाला चांगलाच चोप दिला. यावेळी चालकाने ही गुरे आजरा येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. हा प्रकार आज येथील उपजिल्हा रुग्णालय समोरील रस्त्यावर घडला. त्यानंतर त्या गुरांना मोकळ्या परिसरात सोडून देण्यात आले
