मनसेतर्फे किल्ले सिंधुदुर्गवर होणार शिवजन्मोत्सव सोहळा

मालवण ता.१९-:* तिथीप्रमाणे येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मनसेतर्फे शिवजन्मोत्सव म्हणून मालवणात २१ मार्च रोजी ढोल ताशांच्या मिरवणुकीने तसेच मोटरसायकल रॕलीने साजरी होणार आहे. या मोटरसायकल रॕलीची सुरुवात पिंगुळी कुडाळ येथुन कुडाळ शहर नंतर ओरोस येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवराजेश्वर मंदिरातील महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन व पुष्पहार अर्पण मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या कडून केले जाणार आहे.

तरी मालवणातील सर्व शिवप्रेमी नागरीकांनी, मनसैनिकांनी सोमवार दि.२१ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता भरड मालवण येथे जमावे, असे आवाहन मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव व तालुका सचिव विल्सन गिरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page