Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक स्थळांच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी निधी मिळणार

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर यांनी पर्यटन मंत्र्यांकडे केली मागणी सावंतवाडी ता.२९-:* शहरातील साडेतीनशे वर्षांपूर्वीच ऐतिहासिक श्री देव आत्मेश्वर मंदीर, दामोदर भारती महाराज मठ आणि आत्मेश्वर तळीच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी निधी मिळावा अशी मागणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्यात आली. कुडाळ येथील बैठकीदरम्यान खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण…

Read More

शिवरायांचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे

माजी नगराध्यक्ष संजू परब : प्राथमिक शिक्षक संघटना आयोजित वेशभूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण सावंतवाडी ता.२९-:* छत्रपती शिवाजी महाराज हे खुप मोठे व्यती आहेत.आपण त्यांचा इतिहास वाचतो पण तो समजून घेणे हे खुप महत्वाच आहे. असे प्रतिपादन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केले.मराठी प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेच्या…

Read More

ही तर चोराची उलटी बोंब

नागेंद्र परब यांचा रणजित देसाई यांच्यावर पलटवार सिंधुदुर्गनगरी ता २९ जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नासह हस्तांतरित व अभिकरण योजनांसाठी प्राप्त झालेला कोट्यावधीचा विकासनिधी सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आपल्या कार्यकालात खर्च करू शकले नाहीत. अशा निष्क्रिय ठरलेल्यानी पालकमंत्र्यांवर टीका करणे म्हणजे “चोरांच्या उलट्या बोंबा” असल्याचा प्रकार असल्याची टीका शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी आज पत्रकार…

Read More

कागदपत्र पडताळणीनंतर गुन्हा दाखल करू

पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे लेखी आश्वासन;जयंत बरेगार यांनी ठिय्या आंदोलन घेतले मागे सावंतवाडी ता.२९-: माजगाव बदली पास प्रकरणी खोटे पंचनामे करणाऱ्या तत्कालीन वनपाल, वनक्षेत्रपाल व उपवनसंरक्षक याच्यावर गुन्हा दाखल करायचा की नाही यासाठी सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करुन सात दिवसात निर्णय कळवू असे लेखी पत्र सोमवारी रात्री उशिरा पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिल्यानंतर…

Read More

खारेपाटण हसोळटेंब- कोंडवाडी शाळेचे छप्पर कोसळले

शाळा बंद असताना छप्पर कोसळल्याने अनर्थ टळला कणकवली ता.२९-:* खारेपाटण या गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक हसोळटेंब कोंडवाडी शाळेच्या इमारतीचे छप्पर सोमवारी रात्री अचानक कोसळल्याने इमारतीसह शाळेतील साहित्याचे नुकसान झाले आहे.मोडकळीस आलेल्या या शाळेच्या इमारतीचे छप्पर शाळा बंद असताना पडले म्हणून बरे झाले.अन्यथा शाळा भरलेली असताना आणि मुले वर्गात शिकत असताना जर छप्पर अचानक पडले असते…

Read More

कोकण आयडॉल पुरस्काराने दीपक परब सन्मानित…

कोकण भूमी प्रतिष्ठान तर्फे ठाणे येथे सन्मान.. मालवण ता.२९-:* कोकण भूमीचा पर्यटनातून सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय मी निश्चित केलेले आहे. कोकणामध्ये कृषी क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी मोठा वाव असून संपूर्ण कोकण मधील कृषी क्षेत्राच्या माध्यमातून येथील सर्वांगीण विकास आणि येथील शेतकऱ्यांना नेहमी पुढे आणण्याचा आपला प्रयत्न राहील. देश विदेशातही येथील आंब्याला नावलौकिक मिळवून देण्याचा आपला मानस…

Read More

कुंभवडेत शेकडो काजू कलमे खाक

अज्ञाताकडून प्रकार : मधु गावडे यांच्यावर आर्थिक संकट दोडामार्ग ता.२९-:* भर दुपारी कुणी अज्ञाताने लावलेल्या आगीमुळे ही आग वेगाने पसरत कुंभवडे गावातील शेतकरी मधू गावडे यांच्या काजू बागायती मध्ये शिरून शेकडो काजू झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गावडे यांचे हातीतोंडी आलेले उत्पन्न बुडाले आहे.

Read More

कुडाळातील शिमगोत्सव स्पर्धेला मंत्री आदित्य ठाकरेंची उपस्थिती

आमदार नाईकांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कुडाळ ता.२९-:* हजारो प्रेक्षकांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीत आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली शिमगोत्सव स्पर्धा मोठ्या उत्साहात कुडाळ येथे पार पडली. राधानृत्य, दशावतार, शिमगोत्सवातील रोंबाट या लोककलांच्या माध्यमातून सादर केलेले कलाविष्कार डोळ्यांचे पारणे फेडणारेच होते. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीने हा कार्यक्रम आणखी लक्षवेधी ठरला. प्रत्येकाने आपल्या…

Read More

हेवाळे बांबर्डे घाटीवडे येथे जंगली हत्ती कळप चक्क मुख्य रस्त्यावर

वाहन धारकांचा उडाला थरकाप दोडामार्ग ता.२९-: गेल्या काही दिवसांपासून हेवाळे गावातील बांबर्डे घाटीवडे विजघर येथील शेतकरी बांधव यांच्या शेती बागायती यांचे नुकसान करुन धुमाकूळ घालत असलेला चार जंगली हत्ती कळप सोमवारी मध्यरात्री चक्क दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मुख्य रस्त्यावर चालत जात असताना आढळून आला त्यामुळे या मार्गावर ये जा करणाऱ्या वाहन धारकांचा भितीने थरकाप उडाला….

Read More

बांदा येथील कथाकथन स्पर्धेत कळसुलकरची सई नाटेकर प्रथम

सावंतवाडी ता.२९-:* नट वाचनालय बांदा आयोजित थोर व्यक्तींच्या जीवनातील कथात्मक प्रसंग या विषयावरील कथाकथन स्पर्धेत कळसुलकरच्या इयत्ता पाचवीतील सई स्वागत नाटेकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. वाचनालयाच्या वतीने रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सईला गौरविण्यात आले. तसेच मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत सईने तृतीय क्रमांक प्राप्त केला…

Read More
You cannot copy content of this page